नवी दिल्ली – भारतीय ऍथलेटिक्सला तब्बल तीन वर्षांनी हाय परफॉर्मन्स डायरेक्टर मिळणार आहे. सरकारने या पदासाठी जर्मनीचे वोल्कर हर्मन यांच्या नावाला परवानगी दिल्याचे भारतीय ऍथलेटिक्स संघटनेचे (एएफआय) आदिल सुमारीवाला यांनी जाहीर केले.
पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकच्या दृष्टीने नियोजन आणि रणनीती तयार करण्यासाठी 38 वर्षीय हर्मन यांची हाय परफॉर्मन्स डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.