मुंबई – अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘हिरकणी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या अगोदरच प्रेक्षकांची चित्रपटाप्रती उत्सुकता वाढवली होती.
'हिरकणी' चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली की तिकीटगृहावर हाऊसफुलची पाटी झळकली आहे. हिरकणी चित्रपट प्रदर्शित होताच संपूर्ण महाराष्ट्रभर शोज हाऊसफुल ६० पेक्षा जास्त शोज वाढले.
हिरकणीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा #citycineawardsmarathi चा पुरस्कार ०२.०२.२०२० ला जाहीर झाला,
मी भारतात नव्हते,
परतल्यानंतर बऱ्याच चुकामुकी नंतर finally ही trophy आज माझ्या हातात येत आहेमहाराजांचा आशिर्वादच म्हणावं लागेल????
जय शिवराय ????#शिवजयंती च्या शुभेच्छा ???? pic.twitter.com/fhJb47iVVp
— Sonalee (@meSonalee) February 19, 2020
दरम्यान, या चित्रपटातील ‘हिरकणी’च्या भूमिकेसाठी सोनाली कुलकर्णी यांना सिटी सिनेमा अवॉर्ड तर्फे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. याबाबत सोनाली कुलकर्णीने ट्विट द्वारे फोटो शेअर करत माहिती दिली आहे. तत्पूर्वी महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१९ तसेच सकाळ प्रिमीयर आवॉर्डस् २०१९ मध्येही, ‘हिरकणी’साठी सोनाली कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पुरस्कार मिळाला आहे.