शेवगाव (प्रतिनिधी) – येथील धाकटे शिखर शिंगणापूर म्हणून ख्यातनाम असलेल्या माळेगावनेच्या श्री महादेव देवस्थानामध्ये श्रावणानिमित्त सोमवार दि.८ ते दि.१९ आॅगस्ट या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व शिवलिलामृत पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री महादेव देवस्थानामध्ये सोमवारी (दि. १२) रात्री ७ ते ९ या वेळेत कुरुडगाव येथील नारायण महाराज औटी यांच्या कीर्तनाने सप्ताहास प्रारंभ होणार आहे. मंगळवारी (दि.१३) संदीप महाराज म्हस्के, बुधवारी ज्ञानेश्वर महाराज गावडे, गुरुवारी अक्षय महाराज उगले, शुक्रवारी भानुदास महाराज शास्त्री,
शनिवारी ज्ञानेश्वर महाराज साबळे,रविवारी देविदास महाराज म्हस्के यांची कीर्तने होणार आहे. सोमवारी (दि. १९) पहाटे ५ वाजता अभिषेक, सकाळी ८ ते ९ मिरवणूक १० ते १२ या वेळेत मठाधिपती तोंडोळी येथील पांडुरंग महाराज झुंबड यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळयाची सांगता होणार आहे.
महाप्रसादाची व्यवस्था उत्तमराव शेलार, डॉ. श्रीकांत बोबडे व विठ्ठल गावडे यांनी केली आहे. सात दिवस नाष्टयाची व्यवस्था वस्तीवरील, गावातील व परिसरातील नागरिक ठेवणार आहेत. या कार्यक्रमाचा तालुक्यातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री महादेव देवस्थानचे प्रमुख बाबासाहेब वाकडे, विश्वस्त व ग्रामस्थांनी केले आहे.