ल्यूसन : भारताची दुसऱ्या क्रमांकाची महिला ग्रँडमास्टर द्रोणावल्ली हरिका हिला महिलांच्या फिडे ग्रांपि स्पर्धेच्या सातव्या फेरीमध्ये बरोबरीवर समाधान मानावे लागले. सातव्या फेरीत झालेल्या लढतीत कझाकिस्तानच्या जानसाया अब्दुमलिक हिने द्रोणावल्लीला बरोबरीत रोखले.
ल्यूसन येथे सुरू असलेल्या स्पर्धेत हरिका हिने आतापर्यंत 4 गुण प्राप्त केले आहेत. ती रूसच्या दोन खेळाडूच्या अर्ध्या गुणांनी मागे आहे. रूसच्या अलेक्जेंद्रा गोरियाश्किना आणि एलेना काशलिनस्काया या खेळाडू गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. हरिकाला आता पुढील फेरीत बुल्गारियाच्या एंटोनेटा स्टीफानोवा हिचे आव्हान असणार आहे.
दरम्यान, सहाव्या फेरीत हरिकाला रूसच्या अलेक्जेंद्रा कोस्तेनियुकाकडून पराभव पत्करावा लागला होता. अलेक्जेंद्राने 55 चालीनंतर हरिकावर विजय नोंदविला होता.