ल्यूसन – भारताची दुसऱ्या क्रमांकाची महिला ग्रँडमास्टर द्रोणावल्ली हरिका हिला महिलांच्या फिडे ग्रांपि स्पर्धेच्या आठव्या फेरीमध्ये पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे ती चार गुणांसह स्पर्धेतील गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहचली आहे.
मंगळवारी झालेल्या आठव्या फेरीतील सामन्यात बुल्गारियाच्या एंटोनेटा स्टीफानोवा हिने हरिकाचा 95 चालीमध्ये पराभव केला. या विजयासह स्टीफानोवाचे 3.5 गुण झाले आहेत. आता नवव्या फेरीत हरिकासमोर रूसच्या एलिना काशलिन्सकाया हिचे आव्हान असणार आहे.
दरम्यान, सातव्या फेरीत हरिका हिला कझाकिस्तानच्या जानसाया अब्दुमलिक हिने बरोबरीत रोखले होते. तर, सहाव्या फेरीत तिला रूसच्या अलेक्जेंद्रा कोस्तेनियुकाकडून पराभव पत्करावा लागला होता.