अमेरिका हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी हरेंद्रसिंग

नवी दिल्ली  -भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांची अमेरिका हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. 

2012 मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या हरेंद्रसिंग यांनी 2017 ते 2018 या कालावधीत भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्याआधी ते महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते.

हरेंद्र लवकरच आपल्या कुटुंबासह अमेरिकेला रवाना होणार आहेत. 2018 सालच्या आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी पहिल्याच स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकून दिले होते.

त्याचबरोबर भुवनेश्‍वर येथे झालेल्या 2018च्या विश्‍वचषक स्पर्धेत हरेंद्र यांच्या प्रशिक्षक पदाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.