दुबई – भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या आयपीएल स्पर्धेच्या तयारीसाठी दुबईत आहे. पंड्या याला महागडी घड्याळे तसेच महागड्या गाड्यांची आवड आहे.
— hardik pandya (@hardikpandya7) November 16, 2021
त्यात शॉपिंग करताना त्याने तब्बल पाच कोटी इतक्या प्रचंड रकमेचे घड्याळ खरेदी केले. हे घड्याळ आपल्या मनगटावर लावून पंड्याने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. याच घड्याळंला कस्टम विभागानं एयरपोर्टवर जप्त केल्याची बातमी ताजी असतानांच हार्दिक पांडे याने सोशलवर याबाबत माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाला हार्दिक पंड्या
‘मी कायद्याचं पालन करणार माणूस असून 15 नोव्हेंबरला सकाळी दुबईहून परतत असताना मी माझी बॅग स्वतः मुंबई विमानतळाच्या कस्टम काउंटरवर गेलो आणि तिथून आणलेल्या सर्व वस्तूंची कस्टम ड्युटी भरली. मात्र या संपूर्ण घटनेला चुकीचा माहितीच्या आधारावर व्हायरल करण्यात आले.
ते पुढे लिहितात,’सीमाशुल्क विभाग सध्या शुल्क मोजत आहे, जे मी भरण्यास तयार आहे. तसेच घड्याळाची किंमत 5 कोटी नाही तर 1.5 कोटी आहे.’