मुंबई – गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचे नेतृत्व पाहून ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू ब्रॅड हॉग चांगलाच प्रभावित झाला आहे. भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी पंड्या हा चांगला पर्याय ठरेल, त्याची देहबोली व एक कर्णधार म्हणून तो घेत असलेले निर्णय पाहता त्याच्या नेतृत्वात महेंद्रसिंह धोनीची झलक दिसते, असेही हॉगने म्हटले आहे.
धोनी जसा सामन्यातील कोणत्याही स्थितीत शांत राहायचा तोच गुण पंड्याने घेतला आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 20 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला. हा संघ यंदाच्या स्पर्धेत नवा संघ होता, त्यामुळेच पंड्याची कामगिरी विशेष महत्त्वाची ठरते, असेही हॉगने सांगितले.