मुंबई – दुबईवरून येताना हार्दिक पंड्याच्या सुमारे पाच कोटी रुपयांची घड्याळे कस्टम्सने जप्त केल्याचे वृत्त पसरले होते. त्यावर पंड्याने खुलासा केला असून कायद्याचे उल्लंधन केले नसल्याचेही सांगितले आहे.
माझ्याकडे या घड्याळ्यांच्या खरेदीच्या पावत्या असून कस्टम्सला पूर्ण सहकार्य करणार असून आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करणार आहे, असेही पंड्याने सांगितले आहे.
मी कायद्याचे पालन करणारा एक सुजाण नागरिक आहे आणि मला मुंबईच्या सीमाशुल्क विभागाकडून (कस्टम्स) पूर्ण सहकार्य मिळाले आहे आणि मी त्यांना माझ्या पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली आहे आणि त्यांना सर्व कागदपत्रे देणार असून मी कोणताही कायद्या भंग केलेला नाही. माझ्यावरील सर्व आरोप पूर्णपणे निराधार आहेत, असेही तो म्हणाला.
यापूर्वी गेल्या वर्षी हार्दिकचा भाऊ कृणाल पंड्यानेही अशीच महागडी घड्याळे आणली होती. त्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता.