दिल्ली पोलिसांकडून कथित हार्ड डिस्क जप्त

मुंबई,  – दिल्ली पोलिस असल्याचे सांगून दोन जणांनी 12 फेब्रुवारी रोजी घरातून कंम्युटरची हार्ड डिस्क आणि अन्य वस्तू घेऊन गेले आहेत. मात्र त्यांच्याकडे घराची झडती घेण्याचे वॉरंट नव्हते, अशी तक्रार पोलिसांकडे टूलकीट प्रकरणातील संशयित आणि पर्यावरणवादी कार्यकर्ता शंतनु यांचे वडील शिवलाल मुळूक यांनी केली आहे.

बीडचे पोलिस अधिक्षक राजा रामस्वामी म्हणाले, शिवलाल मुळूक यांनी मंगळवारी तक्रार दाखल केली आहे. त्याची खातरजमा करून योग्य ती कारवाई करत आहोते.

बिडमधील एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे निवेदन करत आहे. त्यांच्या घराची घेतलेल्या झडतीसंदर्भात योग्य तपास करावा अशी विनंती करून ते म्हणाले, 12 फेब्रुवारीला दुपारी साडे पाचच्या सुमारास बीडच्या चाणक्‍यपुरी भअगातील आमच्या निवासस्थानी दोन व्यक्ती आल्या. त्यांनी ते दिल्ली पोलिस असल्याचे सांगत त्यांचे ओळखपत्र दाखवले. दिल्ली पोलिसांना शंतनू हवा आहे. त्याचे खलीस्तानवाद्यांशी संबंध आहेत. त्यांनी शंतनु मुळूकच्या खोलीतून हार्ड डिस्क , पर्यावरण पोस्टर, आणि मोबाईल फोनचे कव्हर ताब्यात घेतले या वस्तू ताब्यात घेण्यापुर्वी त्यांनी कोणतेही झडतीचे वॉरंट दाखवले नाही. आमच्या परवानगी शिवाय या वस्तू त्यांनी परस्पर नेल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.