#CWC2019 : फिरकीपटू हरभजन सिंगकडून ‘जडेजा-धोनी’चे कौतूक, म्हणाला…..

नवी दिल्ली – शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत रवींद्र जडेजा याने भारतास विजय मिळवून देण्यासाठी शर्थीची झुंज दिली. मात्र, त्याची ही झुंज संघास अंतिम फेरी गाठण्यासाठी अपुरीच पडली. यााबाबत हरभजनसिंग याने रवींद्र जडेजा व महेंद्रसिंग धोनी यांनी दिलेल्या लढतीचे कौतुक केले आहे.

हरभजन सिंग म्हणाला की, ‘भारताच्या पराभवानंतर मी खूप निराश झालो आहे. भारताने विजयाची संधी वाया घालविली. जडेजा व धोनी यांच्या खेळास मी सलाम करतो. त्यांनी दिलेली लढत संस्मरणीयच होती. विल्यमसनला याला मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो’.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.