नवी दिल्ली : भारताचा प्रसिध्द आॅफस्पीन गोलंदाज हरभजनसिंग येत्या मार्च महिन्यात सुरू होत असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगनंतर (आयपीएल) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. हरभजन चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे.
आयपीएल दरम्यानच तो आपल्या निवृत्तीची घोषणा करेल. मार्च २०१६ मध्ये हरभजन भारतीय संघाकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याला गेल्या चार वर्षात संघात स्थान मिळालेले नाही.
हरभजनने मार्च १९९८ मध्ये कसोटी पदार्पण केले. त्याने १०३ कसोटीतून ४१७ बळी घेतले आहेत. आयपीएलमध्ये तो २००८ ते २०१७ या कालावधीत मुंबई इंडियन्सचे तर २०१८ पासून यंदाच्या स्पर्धेपर्यत चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व केले आहे.