क्रीडा मंत्रालयाने फेटाळला अर्ज
नवी दिल्ली : राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी हरभजन सिंग याचे नाव चर्चेत होते. पण हरभजनला यंदाच्या वर्षी हा पुरस्कार नक्कीच मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पंजाब सरकारने भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याच्या नावाची शिफारस केली होती. मात्र हा अर्ज क्रीडा मंत्रालयाने फेटाळून लावला आहे.
महत्वाची बाब म्हणजे भारताची मान उंचावणाऱ्या स्टार धावपटू द्युती चंदलाही अर्जुन पुरस्कार नाकारण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी तिच्या नावाचीही शिफारस करण्यात आली होती, पण रॅंकिंगमध्ये मागे पडल्याने तिच्याही यंदाच्या वर्षातील पुरस्काराच्या आशा मावळल्या आहेत.