आता पुन्हा कोणी असे करण्याचे धाडस करणार नाही – हरभजन सिंग

हैद्राबाद – हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील चार आरोपींचा आज पहाटे हैद्राबाद पोलिसांनी इन्काउंटर केला. हैद्राबाद पोलिसांनी ठार झालेल्या चार आरोपींना प्रकरणाचा तपास करण्यासाठी घटनास्थळावर नेले होते. त्यावेळी आरोपींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी त्यांना पळून न जाण्याचा इशारा दिला होता, मात्र, त्यांनी पळण्याचा प्रयत्न केल्यामुळे नाईलाजाने पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या चकमकीत चारही आरोपी ठार झाले.

दरम्यान, या घटनेनंतर देशभरातून हैद्राबाद पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. यामध्ये भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग यानेदेखील पोलिसांची प्रशंसा केली आहे. हरभजनने ट्विट करत म्हटलय की “हैदराबाद सरकार आणि पोलीस यांनी उत्तम कामगिरी केली. त्यांनी साऱ्यांना दाखवून दिले की हे असेच व्हायला हवे होते. आता पुन्हा कोणी अस करण्याचे धाडस करणार नाही, असे ट्विट हरभजनने केले. त्याचसोबत त्याने भारत सुरक्षित बनवा (#makeitsafeindia) असा टॅगदेखील दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.