हरभजन सिंगने पूर्ण केले “फ्रेंडशिप’चे शूटिंग

पुणे – भारतीय क्रिकेट संघातील माजी फिरकीपटू हरभजन सिंग हा “फ्रेंडशिप’ चित्रपटातून सिल्व्हर स्क्रीनवर डेब्यू करण्यास सज्ज झाला आहे. त्याने आपल्या या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा एक मनोरंजनात्मक चित्रपट आहे. 

यात हरभजन सिंगसह ऍक्‍शन किंग अर्जुन आणि लोसलिया यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे निर्माता किरण रेड्डी मंडाडी म्हणाले, मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, आम्ही “फ्रेंडशिप’चे अंतिम शेड्यूल पूर्ण केले आहे. मस्ती आणि ऊर्जाने भरलेल्या या चित्रपटात हरभजनसह काम करणे हा एक अद्‌भूत अनुभव होता. 

आता चित्रपटाचे लवकरच डबिंग सुरू करण्यात येणार आहे. कारण हा चित्रपट हिंदी, तमिळ, पंजाबी आणि तेलुगू आदी विविध भाषेत रिलीज करण्यात येणार आहे. हा खूपच रोमांचक अनुभव असणार आहे, जेथे भज्जी हा एका वेगळ्या अवतारात आणि वेगवेगळ्या भाषेत बोलताना दिसणार आहे. 

यापूर्वी हरभजन सिंगने काही छोट्या भूमिका साकारलेल्या आहेत, तर काही वेळ गेस्ट अपियरेंसही दिलेला आहे; परंतु तो आता “फ्रेंडशिप’मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट या वर्षात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.