हरभजनकडून चिनीबंदची हाक

मुंबई – चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सच्या संपादकांनी केलेल्या टीकेवर खळाळून हसत भारतीय क्रिकेटपटू हरभजनसिंगने चिनीबंदची पुन्हा एकदा हाक दिली आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेला एक रुपयाचा जरी तोटा झाला तरीही मी केलेले आवाहन यशस्वी ठरले असे मला वाटेल, अशा शब्दात हरभजनसिंगने आपला संताप व्यक्त केला आहे. 

लडाखच्या गलवानमध्ये चिनी सैन्यांकडून 20 भारतीय जवान शहीद झाल्याने देशभर चीनविरोधात असंतोष वाढत असून विविध स्तरांवर चिनी वस्तूंची खरेदी करु नका, बहिष्कार टाका अशी आवाहने केली जात असून त्यात हरभजनने सर्वात जास्त पुढाकार घेतला आहे. विविध संस्था व संघटना यांच्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर नागरिकांनी चिनीबंद मोहिमेला सहकार्य केले तर येत्या काळात त्यांच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागेल, असा विश्‍वासही त्याने व्यक्त केला.

हरभजनच्या भूमिकेला कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनेही (सीटीआय) समर्थन दिले असून त्याच्या प्रयत्नांचेही कौतुक केले आहे. देशात ज्यांना आपण सेलीब्रिटी म्हणतो त्यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक जण त्यांच्या पावलावर पाऊल टाकत विविध क्षेत्रांत अव्वल कामगिरी करताना दिसतात. क्रीडाक्षेत्रच नव्हे तर चित्रपट किंवा अन्य क्षेत्रात या सेलीब्रिटींच्या उंचीवर जाण्यासाठी अनेकजण मेहनत घेतात. आता याच सेलीब्रिटींनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनात सामील होत देशातील युवा उद्योजकांना आत्मनिर्भरतेची प्रेरण दिली पाहिजे, अशी अपेक्षाही हरभजनने व्यक्त केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.