मुंबई – दृश्यम २ च्या जबरदस्त यशानंतर अहिनेत अजय देवगण आपल्या आगामी सिनेमाच्या तयारीसाठी थेट वाराणसी येथे पोहचला.यावेळी अजयने टीमसह काही ठिकाणांची चित्रीकरणासाठी पाहणी देखील केली. यावेळी अजयने काशी विश्वनाथाचे दर्शन देखील घेतले.या ठिकाणचे काही फोटो देखील अजयने आपल्या सोशल मिडीआयवर शेअर केले आहे. काशी विश्वनाथच्या गंगाद्वारला जाऊन अजयने बाबा विश्वनाथाचे दर्शन घेत हर हर महादेवचा जय जयकार केला.
दृश्यम २ शंभर कोटींच्या घरात गेल्यानंतर अजयने आपल्या आगामी भोला या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित केला आहे. जो प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. बॉलिवूडचे मोठे मोठे बिग बजेट सिनेमी फ्लॉप जात असताना अजय देवगणने मात्र सुपर हिट चित्रपट सुरूच ठेवले आहेत. मोठा पडदा असो वा ओटीटी प्लॅटफॉर्म अजयचा सगळीकडेच बोलबाला आहे.
काशी विश्वनाथ के दर्शन 🔱 Been waiting for this for a very long time!
हर हर महादेव। pic.twitter.com/KYLCivw4QS
— Ajay Devgn (@ajaydevgn) November 25, 2022
महादेव चरणी नतमस्तक होऊन येताना अजयला चाहत्यांनी घेरले. अजयला पाहण्यासाठी आईवेळी मोठी गर्दी झाली होती. यावेळी काहींनी त्याला सिंघम म्हणून आवाज दिला तर काहींनी अज्जू भाई म्ह्णून हाक मारली. अजयने देखील हात दाखवून सर्वांचे आभार व्यक्त केले.