#HappyBirthdayMSD : म्हणून धोनीसाठी 7 क्रमांक ठरतो लकी

भारताचा अष्टपैलू फलंदाज, माजी कर्णधार, यष्टीरक्षक अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस. धोनी आज 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त धोनीवर त्याचे चाहते आणि इतर क्रिकेट खेळाडूंकडून वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने काही दिवसापूर्वी आपल्यासाठी 7 हा नंबर खूपच लकी असल्याचे कारण सांगितले होते. त्याने सांगितले की, माझा न्युमेरोलॉजीवर खूप विश्‍वास आहे. 7 क्रमांकाशी निगडीत प्रत्येक गोष्ट मला भावते, त्यामुळेच क्रिकेट खेळतानाही मी 7 क्रमांकाची जर्सी घालतो असेही धोनीने स्पष्ट केले.

धोनीची जन्म तारीखही 7 आहे. झारखंडमधील रांची शहरात 7 जुलै 1981 ला धोनीचा जन्म झाला. तारीख व महिना दोन्ही 7 असल्याने त्याला हाच क्रमांक आपल्यासाठी सर्वात लाभदायक असल्याचा विश्‍वास आहे. त्याच्या ताफ्यातील अनेक मोटारी व दुचाकींमधील जवळपास 90 टक्के वाहनांचे क्रमांक 7 आहेत.

क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यावर पहिला करार त्याने एका स्मार्टफोनच्या कंपऩीशी केला होता. या करारावर जेव्हा त्याने स्वाक्षरी केली त्या दिवशीही 7 तारीखच होती. इतकेच नाही तर हा करार सकाळी 7 वाजता व 7 वर्षांसाठी केला. इतक्‍या दीर्घ मुदतीसाठी करार करणारा धोनी हा क्रिकेटसह सर्व क्रीडा विश्‍वातील पहिलाच व एकमेव खेळाडू ठरला.

Leave A Reply

Your email address will not be published.