#HappyBirthday ‘दयाबेन’

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीचा  आज वाढदिवस …१७ सप्टेंबर १९७८ साली गुजरातमध्ये जन्मलेली  दिशा वकानी आज कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

हे माँ माताजी असं म्हणतं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे दिशा वकानी. त्याचबरोबर गरबा खेळण्याच्या हटके स्टाइलमुळे लोकप्रिय झालेल्या दयाची भूमिका आजही लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करते.

दरम्यान, दिशा २००८ पासून सब टीव्हीच्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत काम करत आहे. या मालिकेतून दिशाला लोकप्रियता मिळाली. शिवाय ‘खिचडी’ (२००४) आणि ‘इंस्टेंट खिचडी’ (२००५) या मालिकांमधून ती छोट्या पडद्यावर दिसली आहे. दिशाने आतापर्यंत १० पेक्षा जास्त टेली अवॉर्ड्स जिंकले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.