Happy women’s day 2021 : महिलांचा खरा सन्मान

आपल्यावर होणारे अन्याय, अत्याचार, शोषण याची तिला जाणीव आहे परावलंबित्वेबद्दल चीड आहे. आपल्या भावनांना ती आता व्यक्त करू लागली, समाजात वावरणारी, नोकरी, व्यवसाय सर्व घटनांकडे डोळसपणे पाहणारी अन्यायाविरुद्ध, हक्काविरुद्ध बंड करणारी स्वत्व टिकवून ठेवणारी ती आजची एकविसाव्या शतकातील आधुनिक स्त्री झाली.

आयुष्य जगताना नोकरी व संसार याचा ताळमेळ ती साधू लागली आपल्या अस्तित्वाची जाणीव तिला केवळ एक स्त्री म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून बघण्याची दृष्टी समाजाला तिने दिली. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अगदी वडील, भाऊ, पती, मुलगा या सर्वच पुरुषांच्या मनात तिने आपले स्थान निर्माण केले. एकोणीसाव्या शतकांपर्यंत स्त्रीने केलेली ही प्रगती वाखाणण्यासारखीच मग तिला समानतेच्या बिरुदात बोलताना पुरुषांनी आपल्या संयमाच्या पायऱ्या ओलांडण्याचा विचार बाजूला ठेवायला हवा स्त्रीशिवाय विश्‍व अपूर्णच ही संकल्पना कायम रुजणारी टिकणारी ठरेल, तर आता पुरुषांना आदर्श होण्याची गरज निर्माण करायला हवी.

निसर्ग सृष्टीमुळे निर्माण होतो तसेच पुरुष स्त्रीमुळे मग अशी विकृत मानसिकता निर्माण होऊच कशी शकते? आजची स्त्री आधुनिक तर आहेच पण ती असुरक्षित का वाटते तिला यातून बाहेर काढणे हाच महिलांचा खरा सन्मान ठरेल. या महिला दिनाच्या निमित्ताने तिचा खरा सन्मान ठरेल…..तिची ही व्याप्ती खऱ्या अर्थाने सफल होईल….!

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.