मित्र भेटीचा आनंद…

डॉ. दिलीप येळगावकर राज्याचे नेते : डॉ. सुरेश खाडे

सातारा – माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी सातारा जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष तळागाळात पोहचवला, त्याची पोचपावती त्यांना मिळायला हवी. डॉ. येळगावकर जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे नेते आहेत, असे गौरवोद्‌गार राज्याचे सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी येळगावकरांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीच्या वेळी काढले.

दिलीप येळगावकर व खाडे यांनी विधानभवनाबाहेर केलेल्या आंदोलनाच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी येळगावकरांच्या पाणी प्रश्‍नावरील अभ्यासाचे कौतुक केले. येळगावकरांच्यामुळेच उरमोडी, जिहे कटापुरची योजना पूर्णत्वास गेली.

तसेच टेंभू योजनेचे पाणीही माण तालुक्‍यातील 16 गावांसह व खटावमधील मायणीसह 16 गावांना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. येळगावकरांचा शासनस्तरावरचा पाठपुरावा ही त्यांची जमेची बाजू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.