मुंबई पोलिसांकडून ‘होळी’ च्या हटके शुभेच्छा

मुंबई –  मुंबई पोलीस हे नेहमीच आपल्या वेगळ्या शैलीत जनजागृती करत असतात. तसेच मुंबई पोलीस वेळोवेळी नागरिकांना सोशल माध्यमांवर देखील नियमांची आठवण करून देत असतात. सण म्हंटले की हमखास नागरिकांकडून नियम डावलले जातात. त्यामुळे होळीच्या दिवशी नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत व कायद्याचे उल्लंघन करू नये  यासाठी मुंबई पोलिसांनी सोशल माध्यमांद्वारे नागरिकांना आव्हान करीत काही वेगळे ट्विट्स केले आहेत. ‘बुरा ना मानो होली हे’ या वाक्याचा उपयोग करत सदैव तत्पर असणाऱ्या मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर या सोशल खात्यावरून ‘बुरा ना मानो सेफ्टी हे’ असा ट्रेण्ड वापरत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.