बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फिटनेस आणि बोल्ड लुकमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात असते. ती सोशल मीडियावर आपले हॉट ऍण्ड बोल्ड फोटो शेअर करत असते. आता मलायकाने होळीनिमित्त चाहत्यांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
मलायकाने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती एक फोटो क्लिक करताना दिसत आहे. हा ब्लॅक ऍण्ड व्हाइट फोटो पोस्ट करत तिने धुलिवंदनसाठी खास अंदाज चाहत्यांशी शेअर केला आहे. मलायकाने पोस्टमध्ये लिहिले की, “आपण सर्वांना होळीच्या खूप-खूप शुभेच्छा. आपण सुरक्षित रहा आणि घरातच सण साजरी करा.’
या फोटोत मलायका ट्रॅक पॅट आणि स्पोर्ट ब्रामध्ये दिसत आहे. मलायकाचा हा शुभेच्छा देतानाचा अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. या फोटोतील तिच्या फिट बॉडीचे चाहत्यांनी तोंड भरून कौतुक केले आहे. तसेच अनेकांनी कमेंटस् करत तिल्याही शुभेच्छा दिल्या. दरम्यान, अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे मलायका कायम चर्चेत असते. या दोघांनीही रिलेशनशिपबाबत खुलेपणाने स्वीकार केला आहे. या दोघांना अनेकवेळा एकत्रित स्पॉट करण्यात आलेले आहे.