एसटीची कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

कर्मचाऱ्यांना 2500 तर अधिकाऱ्यांना 5 हजार देणार

मुंबई (प्रतिनिधी)– दिवाळीच्या तोंडावरच परिहवन मंत्री, एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडून एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीची गोड भेट मिळणार आहे. दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना 2500 रुपये तर अधिकाऱ्यांना 5 हजार रुपयांची भेट म्हणून देण्यात येणार आहे. या निर्णयाचा फायदा 1 लाख 10 हजार अधिकारी-कर्मचारी वर्गाला होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती रावते यांनी दिली.

1 महिन्याचा मिळणार महागाई भत्ता
केंद्र व राज्यशासनाप्रमाणे देय असलेला 3 टक्के महागाई भत्ता 1 जानेवारी 2019 पासून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी माहे ऑक्‍टोबरच्या वेतनामध्ये सदर 3 टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2019 पर्यंतचा थकित महागाई भत्ता देण्याबाबतचा निर्णय यथावकाश घेण्यात येईल. त्यामुळे यंदाची दिवाळीही एसटी कर्मचाऱ्यांना गोड जाणार आहे.

गेली 4 वर्षे एसटी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येते. यापूर्वी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 10,000 रूपये अग्रिम देण्यात आला आहे. आता दिवाळीसाठी कर्मचाऱ्यांना 2500 रुपये व अधिकाऱ्यांना 5 हजार रुपये देण्याचा निर्णय एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला आहे.

सद्या, विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता असल्याने याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला आयोगाची मंजूरी मिळताच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येईल, अशी घोषणा रावते यांनी केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.