अजिंक्‍यतारा कारखान्याच्या कामगारांची दिवाळी गोड

सातारा – अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण, दूरदृष्टी आणि पारदर्शक कारभारामुळे संस्थेच्या प्रगतीचा आलेख नेहमीच चढता ठेवणे शक्‍य होत आहे आणि म्हणूनच अजिंक्‍यतारा कारखान्याचे कामकाज उल्लेखनीय व आदर्शवत आहे. कामगार, कर्मचारी प्रामाणिकपणे व निष्ठेने संस्थेची सेवा करून आपले योगदान देत आहेत त्यामुळे कामगार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रमाचा भरीव असा मोबदला दिलाच पाहिजे ही बाब विचारात घेऊन यंदाचा दिपावली सण आनंदाचा जावा यासाठी संचालक मंडळाने कामगारांना दिपावली सणानिमित्त 21 टक्के बोनस देऊन दिवाळी गोड केली आहे.

यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात कारखान्याचे मार्गदर्शक संचालक शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे की, कोणताही उद्योग काटकसरीचे धोरणानुसार व व्यावसायिक पध्दतीने चालविला गेला तर त्या उद्योगाची आर्थिक भरभराट होते. हा स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांचा आदर्श घेऊन कारखान्याचे कामकाज चालविले जात आहे. संचालक मंडळ नेहमीच सभासद व कर्मचारी यांना केंद्रबिंदू मानून सभासद व कर्मचारी यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे.

कामगार, कर्मचारी प्रामाणिकपणे व निष्ठेने संस्थेची सेवा करून आपले योगदान देत आहेत, त्यांना त्यांच्या श्रमाचा भरीव असा मोबदला दिलाच पाहिजे ही बाब विचारात घेऊन संचालक मंडळाने दिपावली सणानिमित्त 21 टक्के बोनस वाटप करण्याचा एकमुखी निर्णय घेतला असून एकूण रू. 3 कोटी 17 लक्ष इतकी रक्‍कम कामगार कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग केले असल्याचे शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी सांगितले. मागील वर्षीसुध्दा दिपावली सणानिमित्त
18 टक्के प्रमाणे बोनस वाटप करण्यात आले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.