मुंबई : देशभरात नाताळ सण उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. राज्यातही सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत नाताळचे सेलिब्रेशन करण्यात येत आहे. दरम्यान, नाताळनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांनी येशू ख्रिस्तांच्या प्रेम, करूणा आणि क्षमा या तत्वांचे आचरण करायला हवे असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
नाताळ निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून सर्वांनी येशू ख्रिस्तांच्या प्रेम, करूणा आणि क्षमा या तत्वांचे आचरण करायला हवे असे म्हटले आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 24, 2020
नाताळ हा प्रेम आणि आपुलकीचा संदेश देणारा सण आहे. येशु ख्रिस्तांची शिकवण ही माणसातल्या देवत्वाला मानणारी असून त्यांनी करूणामयी, क्षमाशील आणि प्रेमळ मार्गाने जीवन जगण्याचा संदेश दिला. त्यांची हीच शिकवण आजही आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचे सांगून येशूंचा मानवतावादी दृष्टीकोन अंगिकारल्यास समाजात शांतता आणि सौहार्द निर्माण होईल असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी गर्दी न करता साधेपणाने ख्रिसमस साजरा करावा. कोरानासंदर्भात घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.
Wishing happiness, prosperity & peace for all on the occasion of Christmas. #MerryChristmas
सर्वांना नाताळ सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! चैतन्य, आनंद घेऊन येणारा हा सण कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं व सुरक्षिततेचं पालन करून साजरा करुया! pic.twitter.com/l97ge83Fm8
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 25, 2020
सण साजरा करताना कोरोना नियमांचे पालन करा: उपमुख्यमंत्री अजित पवार
येशू ख्रिस्तांनी जगाला दया, क्षमा, शांती, परोपकाराचा संदेश दिला. संपूर्ण जीवन मानवतेच्या कल्याणासाठी काम केले. येशूंच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समाधान, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकता, बंधुता, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार शुभेच्छा संदेशात म्हणतात की, नाताळचा सण सर्वत्र आनंद, चैतन्य, उत्साहाचे वातावरण घेऊन येतो. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देणारा नाताळ यंदाही उत्साहात साजरा करायचा आहे, परंतु सण साजरा करताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे व सुरक्षिततेचे पालन केले पाहिजे. स्वत:चे, कुटुंबाचे, समाजाचे कोरोनापासून संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, ती पार पाडूया, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.