कंगनाने दिल्या पंतप्रधानांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, पहा काय म्हणाली…

मुंबई – देशाचे पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी यांचा जन्म 17 सप्टेबर 1950 रोजी गुजरातच्या वडनगरमध्ये झाला होता. मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. राजकर्त्ये, क्रीडापटू, चाहते यांच्यासह सेलिब्रेटीजही मोदींना विशेष संदेश पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

दरम्यान, याच पार्श्ववभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री ‘कंगना राणावत’ हिने देखील सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. या व्हिडिओद्वारे तिने मोदींप्रती असलेल्या आपल्या भावना व्यक्त करत तुमच्यासारखे पंतप्रधान लाभणे हे आमचे भाग्य आहे, असे म्हटले आहे.

आपल्या व्हिडिओ मध्ये कंगना म्हणाली कि, “माननीय पंतप्रधानजी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आपली नीट कधी भेट झाली नाही. फोटो ऑप्ससाठी आपण भेटलो असून त्यामुळे तुमच्याशी बोलण्याची मला कधी संधी मिळाली नाही. पण मी तुम्हाला सांगते की हा देश तुम्हाला खूप मानतो. इथे खूप आवाज आहे, गोंधळ आहे. तुमच्या बद्दल जे काही बोललं जातं ते कदाचितच कोणाबद्दल बोललं जात असेल आणि इतका अपमान केला जात असेल. कोणत्या इतर पंतप्रधानांप्रती कदाचित असे अभद्र आणि चुकीचे शब्द वापरले जात असतील.”

“मग तुम्हाला माहित आहे, हे खूप कमी लोक आहेत. हा प्रोपोगंडा आहे. पण असे करोडो भारतीय आहेत त्यांचा आवाज सोशल मीडियाद्वारे तुमच्यापर्यंत पोहचत नाही. मी हे जेव्हा पाहते तेव्हा मला असं वाटतं की, इतका सन्मान, इतकी भक्ती यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानां मिळाली नसावी. करोडो भारतीय तुमच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत. आम्ही खूपच भाग्यशाली आहोत की आम्हाला तुमच्यासारखे पंतप्रधान लाभले. जय हिंद..! असं कंगना म्हणाली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.