सचिन तेंडुलकरच्या लतादीदींनी वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

व्हिडीओच्या माध्यमातून दिला आठवणींना उजाळा

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 90 वा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेदेखील अनोख्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने एका व्हिडीओ संदेशाद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली.

सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 1.25 मिनिटांचा एक व्हिडीओ शेअर करत लता मंगेशकर यांना टॅग केला आहे. तसेच यावर त्याने लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असल्याचेही लिहिले आहे. या व्हिडीओमध्ये त्याने लतादीदींबरोबच्या आठवणींनादेखील उजाळा दिला आहे. जेव्हा मी लहान असताना माझ्या आईच्या कुशीत झोपायचो तेव्हापासून मी तुमची गाणी ऐकत आलो आहे. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगू तर तुमचे पहिले गाणे कधी ऐकले हे मला आठवत नाही, असेही तो यामध्ये सांगताना दिसत आहे.

असा एकही दिवस गेला नाही, जेव्हा मी तुमचं गाणं ऐकलं नाही, असंही तो यावेळी म्हणाला. त्याने यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तू.. जहां.. जहां चलेगा, मेरा साया साथ होगा हे गाण तुम्ही माझ्यासाठी गायले होते. ते माझ्यासाठी मोठे गिफ्ट होते. जर देवानं मला कोणतं मोठं गिफ्ट दिलं असेल तर त्या लता मंगेशकर यांच्या रूपात दिलं आहे,असेही तो म्हणाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)