काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्या पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, नेते आणि मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, भाजपाने मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात ‘सेवा सप्ताह’ आयोजन केले आहे.

खासदार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, भाजपने पंतप्रधान मोदींच्या 70 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुका पातळीवर किमान 70 गरजूंची सेवा करण्याचे निर्देश दिले आहेत. दिव्यांगांसाठी शिबिर आयोजित करुन त्यांना आवश्यक उपकरणे दिली जातील. प्रत्येक जिल्ह्यातील 70 ठिकाणी स्वच्छतेचा कार्यक्रम, फळांचे वितरण, रुग्णालयातील रुग्णांची देखभाल आणि रक्तदान असे कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय भाजप कार्यालयात आज सकाळी दहा वाजता कार्यकर्ते केक कापणार आहेत. तर आज दुपारी चार वाजता चांदनी चौकमध्ये एका कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दिव्यांगांना 70 उपकरण वितरित करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.