मुंबई – मराठी सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपल्या अभिनयाची छाप सोडणार अभिनेता ‘सिद्धार्थ जाधव’चा वाढदिवस आहे. सध्या सिद्धार्थ आपल्या जोरदार लूकमुळे देखील सोशल माध्यमांच्या लाइमलाईट असतो.
सिद्धार्थ नेहमीच इंस्टाग्रामवर हटके लूक मधील आपले काही फोटो शेअर करत असतो. त्याचे फॅन्स देखील सिद्धार्थच्या या फोटोंना भरभरून लाईक्स देतात. आता पुन्हा एकदा सिद्धार्थच्या एका नव्या लूकची चर्चा सर्वत्र होत असल्याचे दिसून येत आहे.
View this post on Instagram
सिध्दू to सिध्दार्थ जाधव…. #आपलासिध्दू love you all 🙏🙏 #iradapakka #peopleschamp #siddhumoments
कॉलेज जीवनापासून सिद्धार्थला अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना सिद्धार्थने अनेक एकांकिका गाजवल्या. बकुळा नामदेव घोटाळे, इरादा पक्का, हुप्पा हुय्या या चित्रपटात सिद्धार्थ हिरोच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला.
मराठी सिनेसृष्टीतील एक मोठा कलाकार म्हणून सिद्धार्थकडे आज पाहिले जाते. तरीही सिद्धार्थ जाधव हा अभिनेता आपणही मध्यमवर्गीय कुटंबातून पुढे आलेलो आहोत. याची नेहमी सर्वांना आठवण करून देत असतो.