पुणे – दिग्गज माजी क्रिकेटपटू आणि भारताचा पहिला विश्वविजेता कर्णधार ‘कपिल देव’ यांचा (६ जानेवारी) आज वाढदिवस. कपिल हे आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना पाकिस्तानविरुद्ध खेळले होते. १६ ऑक्टोबर १७८ साली हा सामना फैसलाबाद येथे खेळवण्यात आला होता.
कपिल देव यांचे पूर्ण नाव कपिल देव रामलाल निखंज असे आहे. कपिल यांच्या नावावर सर्वाधिक बळी मिळवण्याचा विश्वविक्रम होता. कसोटी क्रिकेटमध्ये कपिल यांनी सर्वाधिक 434 बळी मिळवले होते.
तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९ हजार ३१ धावा आणि ६८७ बळीत्यांचा हा विश्वविक्रम वेस्ट इंडिजच्या कर्टली वॉल्शने मोडीत काढाला होता. पण हा विश्वविक्रम त्यांच्या नावावर तब्बल 8 वर्षे होता.
साल १९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. याच विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वे विरूध्द १७५ धावांची ऐतिहासिक/विश्वविक्रमी खेळी. कपिल देव यांना अर्जुन, पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं आहे.