बॉलीवूड अभिनेत्री काजोलने बुधवारी आपला 46 वा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्रीचा पती अभिनेता अजय देवगणने तिला सोशल मीडियावर खास शुभेच्छा दिल्या आहेत. अजय देवगणने काजोलबरोबर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “हॅपी रिटर्न ऑफ द डे, फॉरएव्हर ऑलवेज काजोल.’
काजोलची बहीण तनिषा मुखर्जीनेही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक थ्रो बॅक फोटो शेअर केला आहे. तिने लिहिले की, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, माझ्या भव्य, सुंदर आत्म्या. मला प्रेम कसे करावे हे शिकवल्याबद्दल धन्यवाद. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अन्य कलाकारांसह चाहत्यांनी काजोलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
Feels like it’s been twenty two years since the lockdown began. #FridayFlashback @kajol
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास अभिनेत्री काजोल “त्रिभंगा’ चित्रपटाद्वारे डिजिटल डेब्यू करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री रेणुका शहाणेने केले आहे.
View this post on Instagram
The women in my life- my mother, sisters, wife, teachers & daughter spell strength. Saluting them 🙏🏻