पंतप्रधानांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आक्रमक, धडाडीचे नेते आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी महाराष्ट्रात विकासाची नवी उंची गाठली. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गरीबांच्या विकासासाठीही चांगले काम केले आहे. त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो या आशयाचे ट्‌विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु आहे. त्या वादातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)