मुंबई – बॉलिवूडची दमदार अभिनेत्री स्वरा भास्कर 9 एप्रिल रोजी तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. स्वराने वीरे दी वेडिंग, रांझना, प्रेम रतन धन पायो आणि तनु वेड्स मनु रिटर्न्स यासह अनेक बॉलिवूड हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र स्वरा तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. अभिनेत्री बॉलीवूडपासून देशभरात सुरू असलेल्या सर्व मुद्द्यांवर खुलेपणाने बोलते आणि याच कारणामुळे ती अनेकदा वादातही सापडली आहे.
काश्मीर फाइल्सवर स्वराचं वक्तव्य
विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सर्वांनाच आवडला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडले. मात्र स्वरा भास्करने या चित्रपटाविरोधात टीका करत एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये स्वराने विवेक अग्निहोत्रीवर निशाणा साधला होता. तिने लिहिले होते की, ‘जर तुम्हाला तुमच्या मेहनतीबद्दल लोकांनी तुमचे अभिनंदन करावे असे वाटत असेल, तर पहिल्या 5 वर्षांत त्यांच्या डोक्यावर घाण पसरवू नका.’ या ट्विटनंतर स्वरा भास्कर खूप ट्रोल झाली होती.
हिजाब वाद
देशात हिजाब वादवरून राजकारण पेटले होते. त्यावेळी स्वराने देखील आपले मत व्यक्त केले होते. ‘महाभारतात द्रौपदीचे वस्त्रहरण करण्यात आले आणि सभेत बसलेले जबाबदार, ताकदवान, कायदा करणारे लोक बघत राहिले… आज अशीच आठवण झाली.’ असे ट्वीट तिने हिजाब वादावर केले होते. त्यानंतर अभिनेत्रीचा नेकऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले होते.
पद्मावतवर स्वरा भास्करचे वक्तव्य
स्वराने ‘पद्मावत’ चित्रपटातील जौहरच्या सीनवर आपले मत मांडले होते, ज्यामुळे तिला खूप ट्रोल करण्यात आले होते. या सीनवर स्वराने एक पत्र लिहिले, ज्यामध्ये अभिनेत्री म्हणाली, ‘पुरुष महिलांच्या फक्त एकाच गोष्टीवर लक्ष ठेवतात का? त्याव्यतिरिक्त स्त्रियांचे आयुष्य नाही का? बलात्कारानंतर स्त्रीला जगण्याचा अधिकार नाही का? महिलांना मरण्याशिवाय पर्याय नाही का? स्वराच्या या पत्रामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती.
पाकिस्तानसंदर्भात वक्तव्य
‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटादरम्यान स्वरा भास्कर पाकिस्तानविरोधात जोरदार बोलली होती. यादरम्यान अभिनेत्रीने पाकिस्तानवर जोरदार टीका केली होती. पण त्याचवेळी स्वराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, जो 2015 चा होता. या व्हिडिओमध्ये स्वरा पाकिस्तानचे जोरदार कौतुक करताना दिसली होती. हा व्हिडिओ एका पाकिस्तानी शोचा होता, ज्यामध्ये अभिनेत्रीने पाकिस्तानला जगातील सर्वात सुंदर देश म्हणून वर्णन केले होते. या दोन्ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या होत्या.
दरम्यान, स्वराने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले, जे संस्मरणीय ठरले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त, स्वरा OTT प्लॅटफॉर्मवर देखील सक्रिय आहे आणि वेब सीरीज विश्वाचा देखील एक भाग बनली आहे.