#happy birthday : मोस्ट हॅन्डसम ‘हृतिक’

मुंबई – बॉलिवूड सुपरस्टार ‘हृतिक रोशन’ केवळ भारतातच नाही तर जगभर आपल्या दमदार अभिनयामुळे आणि हॅंडसम पर्सनॅलिटीमुळे प्रसिद्ध आहे. आज हृतिकचा वाढदिवस आहे. २००० साली ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून त्याने चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं आणि रातोरात तो प्रसिद्धीच्या झोतात आला.

हृतिकचा डॅशिंग लूक आणि डान्सिंग स्टाइलवर अनेक तरुणी घायाळ आहेत. त्यामुळेच त्याच्याशी लग्न करावं असं प्रत्येक मुळीच स्वप्न आहे. गेल्या काही वर्षांपासून तो आपल्या लुक मुळे प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतो आहे.

दरम्यान, नुकतंच हृतिक रोशनचा ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष २०१९’ च्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच, यापूर्वी ‘टॉप फाइव्ह मोस्ट हॅन्डसम मेन इन द वर्ल्ड’ आणि ‘ग्रीक गॉड’ अश्या यादीत सुद्धा हृतिकने स्थान पटकावले आहे.

प्रत्येक कलाकाराचा एक स्वतंत्र चाहतावर्ग असतो. तसाच हृतिकचादेखील आहे. मात्र या चाहतावर्गात महिलांंचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळेच २००० साली १४ फेब्रुवारीला हृतिकला तब्बल ३० हजार तरुणींनी लग्नाची मागणी घातली होती. एका मुलाखतीमध्ये हृतिकने या गोष्टीचा खुलासा केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.