#HBD: मराठी चित्रपटसृष्टीतील धडाकेबाज अभिनेते ‘महेश कोठारे’

मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवणारे ‘महेश कोठारे’ यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी एक अभिनेता, दिग्दर्शक म्हणून मराठीमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे.

 

View this post on Instagram

 

The good old days of shooting with film and Aerie 435

A post shared by Mahesh Kothare (@maheshkothare) on

त्यामुळे आज मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे एक वेगळेच स्थान आहे. महेश कोठारे यांनी आपल्या चित्रपट सृष्टीतील वाटचालीची सुरवात बालकलाकार म्हणून केली होती.

 

View this post on Instagram

 

📸 🎬 🎥 Throwback Moment from – Thartharaat (1989) 😊

A post shared by Mahesh Kothare (@maheshkothare) on

पत्नी निलीमा, मुलगा आदिनाथ, सून उर्मिला, आई, वडील, आणि नातं जिजा असा त्यांचा परिवार आहे. महेश कोठारे समारंभात, पार्टीत नेहमी आपल्या कुटुंबासोबतच दिसतात. निलिमा आणि महेश यांचे अरेंज्ड मॅरेज झाले असून त्या दोघांनी काहीच भेटीत लग्नाचा निर्णय घेतला होता.

 

View this post on Instagram

 

Zapatlela Inspector Mahesh Jadhav

A post shared by Mahesh Kothare (@maheshkothare) on


‘धूम धडाका’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता. त्यानंतर महेश कोठारेंनी मागे फिरूनच पाहिलं नाही. ‘दे दणा दण’, ‘थरथराट’, ‘धडाकेबाज’, ‘झपाटलेला’, ‘माझा छकुला’, ‘खतरनाक’, ‘पछाडलेला’, असे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. महेश कोठारे यांना विशेष म्हणजे इंस्पेक्टर भूमिकांसाठी ओळखले जाते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.