Happy Birthday Deepika – ब्युटी विथ ब्रेन 

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आज 34वा वाढदिवस आजघडीला दीपिका पादुकोण बॉलिवूडची टॉपमोस्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिची प्रत्येक अदा चाहत्यांना वेड लावते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on


आज सुंदर आणि ग्लॅमरस दीपिकाचे जगाच्या पाठीवर असंख्य चाहते आहेत. अर्थात इथपर्यंत पोहोचणे सोपे नव्हते. याठिकाणी पोहोचण्यासाठी दीपिकानेही अपार मेहनत केली. चित्रपटांत येण्यापूर्वी तिने मॉडेलिंग केले.

 

View this post on Instagram

 

#IIFA2014 🙂

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on


या स्ट्रगलिंग काळातील दीपिकाला आज तुम्ही ओळखूही शकणार नाही. गेल्या काही वर्षात दीपिका कमालीची बदलली आहे. तिच्या या वाढदिवशी आम्ही तिचे काही जुने फोटो घेऊन आलो आहोत. तेव्हा पाहा तर…

 

View this post on Instagram

 

Lahu Munh Lag Gaya

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची मुलगी दीपिका हिचा जन्म कोपनहेगन येथे झाला.


चित्रपटांत येण्यापूर्वी दीपिका मॉडेल होती. कॉलेजच्या दिवसांपासूनच तिने मॉडेलिंग सुरु केले होते. बेंगळुरुच्या नॅशनल लॉ कॉलेजमध्येही तिने रॅम्प वॉक केला होता.

 

View this post on Instagram

 

I purple you…?

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on


पुढे हीच दीपिका लिरिल, डाबर दंत मंजन, क्लोजअप, लिम्का या नावाजलेल्या ब्रॅण्डची ब्रॅण्ड अ‍ॅॅम्बिसीडर बनली.

२००६ हे वर्ष दीपिकासाठी खास म्हणायला हवे. कारण याच वर्षी ती किंगफिशर कॅलेंडर गर्ल बनली. तिला मॉडेल ऑफ द ईअर म्हणून निवडले गेले.


किंगफिशर स्विमसूट कॅलेंडरमध्ये ती सिलेक्ट झाली.

 

View this post on Instagram

 

Hello!?#jiomamimumbaifilmfestival

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on


हिमेश रेशमियाच्या ‘नाम है तेरा’मध्ये दिसली. तोपर्यंत दीपिकाचा बॉलिवूडमध्ये येण्याचा इरादा पक्का झाला होता. अनेक संघर्षार्नंतर २००६ मध्ये तिला कन्नड चित्रपट ‘ऐश्वर्या’ची ऑफर मिळाली. मात्र, बॉलिवूडमध्ये तिचा डेब्यू चित्रपट २००७ मध्ये झाला.

‘ओम शांती ओम’ या पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटासाठी तिला ‘बेस्ट फिमेल डेब्यू’ या कॅटेगरीत फिल्मफेअर अवार्ड मिळाला. यानंतर मात्र दीपिकाने कधीच मागे वळून पाहिले नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.