पुणे – बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अभिनेता ‘अजय देवगण’ याचा आज (दि. 2) वाढदिवस आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध स्टंट मास्टर ‘वीरू देवगण’ यांचा अजय मुलगा आहे.
दिग्दर्शक रोहित शेट्टीसह केलेल्या गोलमालच्या सिरीजमुळे तर अजयला चाहत्यांनी डोक्यावर घेतले. त्यानंतर गंगाजल, रेड, दृश्यम, आणि सिंघममुळे अजय पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला.
नुकतंच अजयच्या ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटातने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तान्हाजी मालुसरे यांच्या धाडसावर हा चित्रपट आधारित आहे.
आज अजयच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अजयची पत्नी काजोल हिनेही ट्विटरवरून अजयला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
Happy birthday to my dashing debonair dauntingly serious husband. I just SERIOUSLY wish you a wonderful day and year ahead. And I SERIOUSLY think you’re more awesome at 50 🙂 pic.twitter.com/FZ7Fcu0Yu4