‘बघतोस काय मुजरा कर’ म्हणत मराठी कलाकारांच्या जनतेला 60 व्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !

मुंबई – महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हिरकमहोत्सवी वर्धापनदिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त  यांनी मराठी कलाकारांकडून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘वैभव महाराष्ट्राचं’ गाण्यातून महाराष्ट्रातील पर्यटक स्थळांची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, या गाण्यात  ‘बघतोस काय मुजरा कर’ म्हणत सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, शशांक केतकर सह मराठी कलाकारांच्या जनतेला 60 व्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे .

महाराष्ट्र यंदा 60 व्या वर्षात पदार्पण करत आहे. 1960 साली मराठी जनतेने एकवटून संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला. 107 जणांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आजही मुंबईच्या हुतात्मा चौकामध्ये या शहिदांचं स्मरण करून त्यांना मानवंदना दिली जाते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.