मुंबई – हनुमान चालीसा प्रकरणात मिळालेल्या जामीनात राणा दाम्पत्याला दिलेला जामीन रद्द करण्याची मागणी मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावत राणा दाम्पत्याला मोठा दिलासा दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार या प्रकरणातील जामीन रद्द करता येणार नाही, असे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आज आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. राणांना जामीन देताना कोर्टाने लादलेल्या काही अटीशर्तींचा त्यांनी भंग केल्याचा आरोप करत मुंबई पोलिसांनी हा जामीन रद्द करण्याची मागणी करत न्यायालयात अर्ज दाखल केला होता.