नवी दिल्ली- कोरोना वायरसचं सावट असतानाच आता चीनमध्ये एका नव्या वायरसने एकाचा बळी घेतला आहे. ही बातमी येताच नागरिकांच्या मनात पून्हा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोना नंतर हंता वायरस मारा करेल का, असा प्रश्न सध्या नागरिकांना पटतो आहे.
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीजच्या रिपोर्टनुसार हंता व्हायरस हा उंदरांमुळे पसरतो. जर कुणाचा उंदराच्या विष्ठा, लाळेशी संपर्क आला आणि त्यानंतर त्या व्यक्तीने तोच हात आपल्या चेहऱ्याला लावला तर त्याला या व्हायरसची बाधा होऊ शकते. या व्हायरसचं संक्रमण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. एखाद्या व्यक्तीलाहंताची बाधा झाली आहे की नाही हे कळण्यासाठी एक ते आठ आठवड्याचा वेळ लागतो.
दरम्यान, हा वायरस संसर्गजन्स नसल्यामुळे फार घाबरुन जाण्याची गरज नाही आहे.