दिव्यांगाची पुणे पालिकेत पुन्हा हेळसांड

नवीन रॅम्प पुन्हा केला बंद; पण अधिकारी अनभिज्ञ

पुणे – महापालिकेत येणाऱ्या दिव्यांगांसाठी पालिकेच्या मुख्य इमारतीच्या समोरील बाजूस उभारण्यात आलेला नवा कोरा रॅम्प बॅरिकेडींग करून बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा रॅंम्प कोणी आणि कशासाठी बंद केला, याची कोणतीही माहिती महापालिकेच्या सुरक्षा, समाज विकास विभाग तसेच भवन विभागाच्या अधिकाऱ्यांना नाही. त्यामुळे पालिकेत येणाऱ्या दिव्यांगाना त्याचा फटका बसत आहे.

मागील वर्षी महापालिकेत बैठकीसाठी आलेला एक दिव्यांग पायरीवरून घसल्याने गंभीर जखमी झाला होता. हा प्रकार दैनिक “प्रभात’ने उजेडात आणत पालिका प्रशासनाच्या कारभाराची चिरफाड केली होती. त्यांची गंभीर दखल घेत महापालिकेकडून हा रॅम्प उभारण्यात आला आहे. त्यानंतर अवघ्या महिन्याभरापूर्वीच तो दिव्यांगासाठी खुला करण्यात आला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तो पुन्हा बंद करण्यात आला आहे. या बाबत सुरक्षा विभाग, भवन विभाग तसेच समाज विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याचे कारण देता आले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.