Hand Broken Arm Wrestling । मित्रांमध्ये मजा करणे आणि नवनवीन गोष्टी करणे ही एक सामान्य गोष्ट आहे. बऱ्याच वेळा बुद्धिमत्ता दाखवण्यासाठी मित्र आपापसात स्पर्धा करतात, त्यानंतर ते पंजा लढवतात. मात्र यावेळी एका व्यक्तीला मित्रासोबत पंजा लडवणे चांगलेच महागात पडले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तरुणाचा हात तुटताना स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल…
पंजा लडवताना तरुणाचा हात मोडला Hand Broken Arm Wrestling ।
मैत्री आणि मौजमजेच्या खेळाचे रुपांतर मुरादाबादमध्ये दुर्दैवी घटनेत झाली. चेष्टेत सुरु झालेली पंजा लडवण्याच्या स्पर्धेत एका तरुणाचा हात मोडला, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. घटनेच्या वेळी दोन्ही मित्रांच्या घरी पंजा लावण्याची स्पर्धा सुरू होती, त्यावेळी मित्र आपापसात पंजा लावत खेळ खेळत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि तरुणाचा हात लागला. त्यानंतर तो तरुण वेदनेने ओरडत असताना दिसून येत आहे. यानंतर शेजारी उभी असलेली एक महिला त्या तरुणाला, “मी तुला असे करू नकोस असे सांगितले होते, पण तू ऐकलं नाहीस.” असे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, पंजा लावताना खूप जोर लावल्यामुळे त्या तरुणाचा हात मधूनच वाकला आणि त्यामुळे त्याचा हात फ्रॅक्चर झाला.
View this post on Instagram
युझर्स म्हणाले, मजा आली का ? Hand Broken Arm Wrestling ।
एका इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 89 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. दरम्यान, सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले… भाऊचा यात काही हात नाही. दुसऱ्या युझरने लिहिले…. हुशारी महागात पडली आता आली का मजा ? तर दुसऱ्या युजरने लिहिले… आता हा भाऊ पुन्हा कधीच पंजा लावणार नाही”