घोड्याच्या रक्तातील अँटीबॉडी करोनावर ठरणार प्रभावी

नवी दिल्ली – घोड्याच्या रक्तात तयार होणाऱ्या अँटीबॉडी करोनावरील उपचारासाठी उपयुक्त ठरू शकतात असे संकेत भारतीय आरोग्य संशोधन संस्थेने दिले आहेत. दशकभरापूर्वी टीटॅनस, रेबीज अथवा सर्पदंशावर याचा उपचार केला जात होता, असेही सांगितले जाते आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि हैदराबाद येथील बायोलॉजिक ई या संस्थांनी याकरताचा शुध्द अँटीसेरा विकसित केला आहे. करोनावरील उपचारासाठी तो उपयुक्त ठरू शकतो असा दावा करण्यात आला आहे.

एका माध्यमाशी बोलताना आयसीएमआरच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोविडच्या विरोधात अत्यंत जलद उपचारासाठी या अँटीसेराचा वापर केला जाउ शकतो. मात्र त्याचे मूल्यांकन करण्याची आवश्‍यकता आहे. घोड्यांच्या रक्तात अँटीबॉडी तयार होण्यासाठी अगोदर त्यांना विषाणूच्या संपर्कात आणावे लागते.

सध्या अर्जेंटिना आणि ब्राझील या देशांत या अँटीसेराचा वापर केला जातो आहे. करोनामुक्त झालेल्या रूग्णाच्या रक्तातून जो प्लाझ्मा घेतला जातो त्यासारखेच हे अँटीसेरा असते, असा दावा ब्राझीलच्या संशोधकांनीही केला आहे.

दरम्यान, या अँटीसेराची चाचणी मध्यम ते अत्यंत गंभीर लागण झालेल्या रूग्णावर घेतली जाण्याची शक्‍यता असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.