माॅस्को : भारताची महिला ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला महिलांच्या जागतिक ब्लिट्झ अंजिक्यपद बुध्दिबळ स्पर्धेमध्ये १०.५ गुणांसह १२ व्या स्थानी समाधान मानावे लागले.
जागतिक रॅपिड बुध्दिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी हम्पी ब्लिट्झ स्पर्धेत पहिल्या दिवशी ९ व्या फेरीनंतर ७ गुणासह दुस-या स्थानावर होती. पण तिला कामगिरीत सातत्य राखता आलं नाही आणि अखेरच्या १७ व्या फेरीत इंटरनॅशनल मास्टर मेरी अराबिद्झने कोनेरू हम्पीवर विजय मिळवला. त्यामुळे दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत हम्पीला १२ व्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
या स्पर्धेत पुरूष गटात नाॅर्वेचा मॅग्नस कार्लसन (१६.५ गुण) तर महिलांच्या गटात रशियाच्या कॅटरीना लॅग्नो (१३ गुण) यांनी विजेतेपद पटकावले. हम्पीशिवाय आणखी एका भारतीय महिला खेळाडू हरिका द्रोणावली या स्पर्धेत २५ व्या स्थानी राहिली.