प्लॉटिंग कार्यालयावर हातोडा

पीएमआरडीएकडून केसनंद येथे अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई
वाघोली (प्रतिनिधी)- केसनंद (ता. हवेली) येथे पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरण यांच्याकडून बेकायदेशीरपणे उभे राहिलेल्या मंगलमूर्ती वास्तू प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयावर हातोडा टाकत बांधकाम पाडण्यात आले. बेकायदेशीरपणे प्लॉटिंगमधील अनधिकृत बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याबाबत येणाऱ्या तक्रारींचा आलेख देखील तालुक्‍यात वाढला आहे.

केसनंदमध्ये असणाऱ्या मंगलमूर्ती वास्तू प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयावर पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम पाडण्यात आल्याने पूर्व हवेलीत एकच खळबळ उडाली होती. या प्लॉटिंगबाबत अनेक दिवसांपासून अनेक जनआंदोलने तसेच तक्रारींचा पाढा पीएमआरडीएकडे रोज वाचला जात होता. बेकायदेशीरपणे आकडा टाकून याच कार्यालयाला वीज चोरी होत असल्याचे वृत्त देखील “प्रभात’मध्ये प्रसिद्ध केल्यानंतर तातडीने या ठिकाणी वीज कनेक्‍शन देण्यात आले होते. प्लॉटिंगच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईने तालुक्‍यातील सर्व कार्यालय धारकांचे या कारवाईने धाबे दणाणले आहेत. त्यामुळे तक्रार आली की, पीएमआरडीकडून कारवाई होते, हे कृतीतून सिद्ध झाले आहे. यात कोणताही भेदभाव होत नसल्याचे “पीएमआरडीए’कडून पुन्हा एकदा या कारवाईने स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.