पुणे – देशभरात सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क बंधनकारक करण्याच्या शक्यतेवर केंद्र सरकार पुन्हा विचार करू लागले आहे. या आठवड्यात या संदर्भात अधिसूचना जारी केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत काही दागिने उत्पादकांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, पुण्यातील बऱ्याच दागिने उत्पादकांनी अगोदरच्या या संदर्भात काम सुरू केलेले आहे. सरकार या संदर्भात या क्षेत्रातील संबंधितांशी चर्चा करून हा निर्णय घेणार आहे. यासंदर्भातील मसुदा या आठवड्यात सार्वजनिक चर्चेसाठी उपलब्ध केला जाण्याची शक्यता आहे.
भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या यासंबंधातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे. त्यामुळे अशाप्रकारचा नियम केल्यास याची माहिती जागतिक व्यापार संघटनेला द्यावी लागते. आता नव्या युगामध्ये हॉलमार्किंगचे डिजिटायझेशन आवश्यक झाले आहे.
यासंदर्भातही सरकार विचार करीत आहे. याकरिता मुंबई आयआयटीची मदत घेण्यात येत आहे. ही प्रक्रिया एक वर्ष चालेल असे बीआयएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या देशभरात हॉल मार्केटिंगची 800 केंद्र आहेत तर देशातील 40 टक्के दागिन्यांवर हॉल मार्क असतात.