अर्धे पुणे आजपासून सील?

शहर, उपनगरांतील 22 परिसर आजपासून बंद

पुणे – करोनाचा धोका टळला नसतानाही गांभीर्य नसलेल्या नागरिकांना चाप लावण्यासाठी आता जवळपास अर्धे पुणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारपासून पुण्याचा आणखी काही भाग सील करण्याचे महापालिका आयुक्तांनी प्रस्तावित केले होते. केवळ सीलच नव्हे, तर पोलिसांनी त्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.

सहा एप्रिल रोजी मार्केटयार्ड ते आरटीओ हा मध्यवस्तीतील बहुतांश पेठांचा भाग सील करण्यात आला होता. याठिकाणी एकाच दिवसात जवळपास 36 बाधित रुग्ण सापडले होते. त्यानंतरही नागरिकांनी ही बाब गांभीर्याने न घेतल्याने आता आणखी काही भाग सील करण्याचा निर्णय घेतला असून, बुधवारपासूनच त्याची अंमलबजावणी होण्याची शक्‍यता आहे.

शहरातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे चिंता व्यक्‍त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कडक उपाययोजना करण्याची मागणी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडूनही केली जात आहे. त्यामुळे नवीन 22 परिसर आजपासून सील केले जाणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.