देहूत इंद्रायणी घाटावर साडेदहा टन निर्माल्य जमा

गणेश विसर्जन : सुमारे तीनशे स्वयंसेवकांनी नदी घाट केला स्वच्छ

देहुरोड – देहू येथे इंद्रायणी नदी घाटावर डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा) यांच्या सुमारे तीनशे स्वयंसेवकांनी नदी घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. निर्माल्य नदी पात्रात न टाकता जमा करण्याचे आवाहन करण्यात आल्याने नागरिकांनी, सार्वजनिक मंडळे, गणेशभक्‍तांनी या उपक्रमास मोठा प्रतिसाद दिला. सकाळी बारा ते सायंकाळी सात वाजे दरम्यान सुमारे साडेदहा टन निर्माल्य जमा करण्यात आले. ट्रॅक्‍टर ट्रॉली आणि घंटागाड्याच्या सहकार्य ग्रामपंचायतीने यावेळी केली. नदी प्रदूषणमुक्‍त आणि घाट परिसर स्वच्छ ठेवण्यास कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

यंदा गणेश मूर्ती दान नाही
गेली दोन वर्षांपूवी मूर्ती नदी पात्रात न विसर्जित करता जमा करण्यात येत होते. मात्र एकाही गणेश मूर्ती दान न होता. नदी पात्रात सर्व मूर्ती विर्सजन झाले.

कडेकोट पोलीस बंदोबस्त…
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी देहू इंद्रायणी नदी घाट परिसराची पाहणी केली. सहायक पोलीस आयुक्‍त संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देहुरोड पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, सहायक पोलीस निरीक्षक शाहीद पठाण, पोलीस उपनिरीक्षक संतोष येडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर गजराज बोटिंगने सुमारे 15 गार्ड तैनात करीत यंदा प्रथमच नदी पात्रात दोर बांधल्याने अनुचित प्रकार
घडला नाही.

गाथा मंदिराजवळ विर्सजनास बंदी
गाथा मंदिराजवळ इंद्रायणी नदी घाट अरूंद असून, पात्र खोल असल्याने या भागात वारंवार दुर्घटना घडत आहेत. गतवर्षी विर्सजनासाठी गेलेल्या एका तरूणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यंदा गाथा मंदिराजवळ इंद्रायणीच्या डोहात गणेश विर्सजनास बंदी करीत रस्त्यावर बॅरिकेट लावत फलक लावण्यात आले होते, तर पोलीसही तैनात करण्यात आले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)