पुणे – वारजे-कर्वेनगर पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस कर्मचारींसोबत हळदी-कुंकू कार्यक्रम व पोलीस बांधवांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्ष नंदिनी पानेकर यांनी हा उपक्रम राबवला. यावेळी प्रभागातील महिलांच्या, मुलींच्या तक्रारीणसंदर्भात चर्चाही करण्यात आली.
हा प्रभाग मुलींच्या शिक्षणासाठी आणि विविध कोर्सेससाठी अग्रेसर आहे. येथे मोठ्या प्रमाणात परराज्यातील मुली वास्तव्यास असून मुलींचे वसतीगृह, महिला खानावळ आहेत. त्यामुळे या भागात नेहमीच छेडछाडच्या घटना घडतात.
अशा समस्या सोडवण्यासाठी स्थानिक महिला रहिवासी व महिला प्रतिनिधी म्हणून आम्ही नेहमीच मदतीसाठी तत्पर असून, असे आश्वासन नंदिनी पानेकर यांनी पोलिसांना दिले. तसेच सदर कार्यक्रमासाठी विशेष सहकार्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास खटके यांचे पानेकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास ज्योती सूर्यवंशी, संगीता मोहोळ, आश्विनी माने, दिपा मोहिते, प्रेमलता जैन, मीना मोरे यांसह आदि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.